मुंबईराजकीय

विभागाच्या विकासासाठी नगरसेवकांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा आवश्यक – महापौर 

प्रतीक्षा नगर येथील क्रीडांगणचे लोकार्पण

 

मुंबई – प्रतिनिधी : आपल्या प्रभागाचा चौफेर विकास व्हायचा असेल तर, प्रभागाच्या विकासासाठी त्या-त्या नगरसेवकांचा महापालिका प्रशासनाकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा करणे आवश्यक आहे. तरच मुंबईचा विकास होऊ शकतो असे मत महापौर किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केले.

प्रभाग समिती अध्यक्ष रामदास कांबळे यांच्या प्रयत्नाने प्रतीक्षा नगर येथे नूतनीकरण करण्यात आलेल्या तांडेल कान्होजी आंग्रे क्रीडांगण व कर्मवीर भाऊराव पाटील मैदानाचे लोकार्पण मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी खासदार अनिल देसाई व खासदार राहुल शेवाळे आदी उपस्थित होते. संपूर्ण कोविड काळात मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या संयमी नेतृत्वाने मुंबई व महाराष्ट्रातील कोरोना नियंत्रणात आणला. सकारात्मक विचार असेल तर आपण काय करून दाखवू शकतो हे आपण जगाला दाखवून दिले असल्याचे महापौरांनी सांगितले.

Garden In Pratiksha Nagar

या सर्व काळात महानगरपालिका तसेच बेस्टच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपला जीव धोक्यात घालून चांगले काम केले असल्यामुळे त्यांना भरघोस असा 20 हजारांचा बोनस सुद्धा मुख्यमंत्र्यांनी जाहिर केला असल्याचे महापौरांनी यावेळी सांगितले. रामदास कांबळे यांनी अल्पावधीत या विभागात चांगले काम करून दाखविले आहे. त्याला प्रशासनाची चांगली साथ लाभली तर काय चमत्कार घडू शकतो, हे आजच्या कार्यक्रमावरुन सिध्द झाले आहे. या कामाबद्दल सहाय्यक आयुक्त गजानन बेल्लाळे यांचे मनापासून अभिनंदन करीत असल्याचे महापौरांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button