'बिग बॉस मराठी'च्या नवीन सीझनच्या पहिल्या आठवड्यात सदस्यांनी चांगलाच गाजवला. पहिल्याच आठवड्यात पुरुषोत्तमदादा पाटील घराबाहेर पडले. शोच्या होस्ट रितेश देशमुखने 'भाऊच्या धक्क्या'च्या आधारावर घरातील सदस्यांची चूक दाखवून त्यांना ठामपणे सांगितले. त्यामुळे दुसऱ्या आठवड्यात घरातील सर्व सदस्य अॅक्टिव्ह मोडवर असतील. पहिल्या आठवड्यात शांत असलेले सदस्य आता एकमेकांशी भिडणार आहेत. गुलिगत सूरज चव्हाण आता अॅक्टिव्ह झाला असून त्याने जान्हवी किल्लेकर सोबत जोरदार वाद घातला आहे.
'बिग बॉस मराठी'च्या दुसऱ्या आठवड्याचा पहिला प्रोमो सध्या रिलीज झाला आहे. या प्रोमोमध्ये जान्हवी किल्लेकर आणि गुलिगत सूरज चव्हाण भांडताना दिसत आहेत. प्रोमोमध्ये जान्हवी सूरजला म्हणते, "तुला काल काय चावी मिळाली का? आठवडाभर तर शांतच होतास ना. माझ्यासमोर शहानपणा करायचा नाही. किती फालतू आहे हा." यावर संतापलेल्या सूरजने जान्हवीला "तू निघ... चल फूट" असे थेट सुनावले. या दोघांच्या वादात घरातील इतर सदस्यांनी हस्तक्षेप करून वाद थांबवण्याचा प्रयत्न केला.
पहिल्या आठवड्यात गुलिगत सूरज चव्हाण खूप शांत होता. बिग बॉस आणि होस्ट रितेश देशमुखने सूरजला कोणालाही घाबरून न राहता, खेळात सक्रिय होण्याची सूचना दिली होती. त्यामुळे जान्हवी सूरजला उद्देशून म्हणते की, "मागील आठवड्यात तू शांत होतास, आता चावी मिळाली आहे का?" यावर सूरज तिला "चल निघ, फूट" असे उत्तर देतो. सूरजकडून मिळालेल्या सडेतोड उत्तरामुळे जान्हवी अधिकच बिथरते आणि सूरजची कडक टीका करते. जान्हवी सूरजच्या अंगावर धावण्याचा प्रयत्न करते, तर दोघांमधील अंकिता जान्हवीला अडवण्याचा प्रयत्न करते. हा वाद नेमका कशामुळे आणि कोणत्या कारणांमुळे झाला हे आजच्या एपिसोडमध्ये स्पष्ट होईल.
पण आता हळूहळू तो आपले खरे रंग दाखवायला लागेल. 'बिग बॉस मराठी'च्या भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने काही सदस्यांची चांगलीच शाळा घेतली, त्यामुळे या आठवड्यात हे सदस्य कसा खेळतील आणि एकमेकांसोबत कसे वागतील हे पाहण्यासाठी प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.
पहिल्या आठवड्यातील एलिमिनेशन
'बिग बॉस मराठी'च्या पहिल्या आठवड्यात एलिमिनेशनचा खेळ झाला आहे. या आठवड्यात सूरज चव्हाण, वर्षा उसगांवकर, योगिता चव्हाण, धनंजय पोवार आणि किर्तनकार पुरुषोत्तम पाटील यांना एलिमिनेशनसाठी नॉमिनेट केले गेले होते. त्यातले किर्तनकार पुरुषोत्तम पाटील यांना बिग बॉसच्या घरातून बाहेर जावे लागले.