Mumbai

गणेश मंडळांसाठी आनंदाची बातमी ! मंडप उभारणीसाठी ऑनलाइन परवानगी देण्यात येणार आहे., सलग ५ वर्षासाठी परवानगी मिळेल

News Image

मुंबई:

पर्यावरणपूरक सार्वजनिक गणेशोत्सव २०२४ सुरळीतपणे पार पाडण्याच्या दृष्टीने बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन सज्ज झाले आहे. महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार गेली १० वर्षे शासन नियमांचे आणि कायद्याचे पालन करणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना यंदाच्या गणेशोत्सवापासून सलग ५ वर्षांकरिता विभाग कार्यालयामार्फत एकदाच परवानगी देण्यात येणार आहे. मात्र असे असले तरी दरवर्षी परवानगी नूतनीकरण करणे गरजेचे असेल.

 

मंडप उभारण्यासाठी  6 ऑगस्ट 2024 पासून एक खिडकी योजनेनुसार सार्वजनिक  गणेशोत्सव मंडळांना मंडप उभारणीसाठी ऑनलाइन परवानगी देण्यात येणार आहे. महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अमित सैनी यांच्या मार्गदर्शनानुसार  यंदाच्या गणेशोत्सवासाठीचे नियोजन आणि अंमलबजावणी करण्यात येत आहे.  गणेशोत्सवाला 7 सप्टेंबर पासून सुरूवात होत आहे. हा उत्सव अधिकाधिक पर्यावरणपूरक व्हावा, यासाठी  महानगरपालिका सातत्याने विविध स्तरावर प्रयत्न करत आहे.

 यंदा महानगरपालिका प्रशासनाने उत्सवादरम्यान विविध स्तुत्य उपक्रम राबविण्याचा संकल्प केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून उत्कृष्ट काम करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांना यावर्षीपासून सलग पाच वर्षांसाठी परवानगी देण्यात येणार आहे. 

Related Post