Mumbai

गोखले पूल ४ जुलै २०२४ पासून पश्चिम - पूर्व दिशेची वाहतूकीसाठी सुरु करणार

News Image

अंधेरीपूर्व व पश्चिम प्रवासासाठीसी. डी. बर्फीवाला उड्डाणपुलाचा भाग अंशतः उचलून तो गोपाळकृष्ण गोखलेउड्डाणपुलाच्या समांतर उंचीवर जोडण्यासाठी हायड्रॉलिक जॅक आणि ‘एमएस स्टूल पॅकिंग’चा वापर करूनदोन्ही पूल जोडण्याचे आव्हानात्मक काम बृहन्मुंबई महानगरपालिकेने विक्रमी वेळेत पूर्ण केले आहे. तसेच, या पूलावर जुहूपासून अंधेरी असा पश्चिम - पूर्व प्रवास करण्याचा पर्याय देणारी मार्गिका जोडण्‍यासंदर्भातील सर्व संरचनात्‍मक कामे पूर्णकरण्‍यात आली आहेत. त्‍यानुसार, 'नॉनडिस्‍ट्रक्‍टीव्‍ह' आणि 'क्‍यू' या दोन महत्‍त्‍वपूर्ण चाचण्‍या घेण्‍यातआल्‍या आहेत. तसेच 'लोड टेस्ट' देखील घेण्यात आली. या सर्व चाचण्‍यांचे परिणाम सकारात्‍मक आल्‍यानंतररविवार, दिनांक ३० जून २०२४रोजी रात्री उशिरा वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्थेने (व्हिजेटीआय) महानगरपालिका प्रशासनास, या मार्गिकेवर वाहतूकसुरू करण्‍यास हरकत नसल्‍याबाबतचे प्रमाणपत्र दिले आहे. त्यादृष्टीने वाहतूक व्‍यवस्‍थापनासंबंधितअनुषंगिक कामे आणि चाचण्‍या पुढील दोनदिवसात पूर्ण केल्‍या जाणार आहेत. त्‍यानंतर म्‍हणजेच, गुरूवार, दिनांक ४ जुलै २०२४सायंकाळी ५ वाजेपासून जुहूदिशेने अंधेरी असा पश्चिम- पूर्व प्रवास करण्याचा पर्याय देणारी मार्गिका वाहतुकीसाठी सुरू केली जाणार आहे. 

अंधेरीपरिसराला पूर्व आणि पश्चिम जोडणारा वाहतुकीसाठी महत्वाचा दुवा असलेल्या गोपाळकृष्ण गोखले पुलाच्या उंचीशी समांतर अशा पातळीवर सी. डी. बर्फीवाला उड्डाणपूल जोडणीच्या दृष्टीने नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्याचे निर्देश बृहन्‍मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांनी दिले होते. त्यानुसार तांत्रिक सल्लागारांच्या देखरेखीखाली सर्व कामे विहित मुदतीत पूर्ण करण्यात येत आहेत. या अंतर्गत सी. डी. बर्फीवाला उड्डाणपुलाचा भाग एका बाजुला १,३९७ मिलीमीटरआणि दुस-या बाजुला ६५०मिमी वर उचलण्यात आलाआहे. या जोडणीच्या कामासाठीगत दोन महिन्‍यांपासून सूक्ष्मस्तरीय नियोजन सुरू होते. हे काम आव्‍हानात्‍मक असून देखीलदिवस रात्र सुरू असल्‍यामुळे केवळ ७८ दिवसात पूर्णझाले आहे.

'काँक्रिटक्यूरींग'च्या कामासाठी आवश्यक १४ दिवसांचा अवधीदेण्यात आला होता. या क्यूरिंगसाठी उच्चदर्जाच्‍या काँक्रिट तंत्रज्ञानाचावापर करण्यात आला होता. क्यूरिंगसोबतच समांतर अशा पद्धतीने जोडणी सांध्याचे कामदेखील पूर्ण करण्यात आले आहे. त्यानंतर पुलावर विशिष्ट तासांच्या कालावधीत 'लोड टेस्ट' करण्यात आली. पुलांवर वाहतूक सुरू होण्याच्या दृष्टीने आवश्यक ते काम यापूर्वीनिर्धारित करण्यात आलेल्या टप्प्यांनुसार पूर्ण करण्यात आले आहे.

सी. डी. बर्फीवाला पुलाची पातळी उचलण्याची कार्यपद्धती व सर्वसाधारण आराखडाहा वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्था (व्हिजेटीआय) तसेच, भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई (आयआयटी) यांचेद्वारे आरेखित केला गेला आहे. तर, पुल जोडणी कार्यपद्धती वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्था (व्हिजेटीआय) यांचेद्वारे बनवण्यात आली. भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मुंबई यांनी या कार्यपद्धतीची पडताळणीकरुन त्यात काही सुधारणा सुचवल्या. सदर सुधारित कार्यपद्धतीची अंमलबजावणी ही बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फतवीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्था (व्हिजेटीआय) यांच्या निरीक्षणाखाली करण्यात आल्‍या आहेत.

यापुलावर जुहू पासून अंधेरी असा पश्चिम- पूर्व प्रवास करण्याचा पर्याय देणारी मार्गिका वाहतुकीसाठी सुरळीत आणि संरचनात्मकदृष्ट्या सुरक्षित (स्‍ट्रक्‍चरलीसेफ) असल्‍याचे 'व्हिजेटीआय' मार्फत घोषित करण्‍यात आले आहे. आवश्यक त्या चाचण्या यशस्वी झाल्यानंतर या मार्गिकेवर वाहतूकसुरू करण्‍याबाबतचे 'ना हरकत प्रमाणपत्र' 'व्हिजेटीआय' संस्‍थेने दिनांक ३० जून २०२४रोजी रात्री उशिरा महानगरपालिकेला दिले आहे.

पुलाच्‍या मार्गिकेवरील वाहतूकसुरू करण्‍याच्‍या दृष्‍टीनेवाहतूक व्‍यवस्‍थापनासंबंधितअनुषंंगिक कामे व चाचण्‍यावाहतूक पोलिसांच्या सुचनेनुसार पुढील दोन दिवसात पूर्ण केल्‍या जाणार आहे. यानंतर म्‍हणजेच, गुरूवार, दिनांक ४ जुलै २०२४रोजी सायंकाळी ५ वाजेपासून पश्चिम- पूर्व मार्गिका वाहतुकीसाठी सुरू केली जाणार असल्‍याचे महानगरपालिका प्रशासनाच्‍या वतीने कळविण्‍यात येत आहे.

हलक्यावाहनांनाच पुलावर प्रवेश, अवजड वाहनांसाठी बंदी-

गोपाळकृष्णगोखले पुलाच्या दुसऱया टप्प्यातील काम सध्या रेल्वे भागातील हद्दीत सुरू आहे. त्यामुळे सी. डी. बर्फीवाला आणि गोखले पुलावर फक्त हलक्या वाहनांना प्रवेशासाठी मुभा देण्यात आली आहे. तर अवजड वाहनांसाठीउंची रोधक (हाईट बॅरिअर) बसविण्यात आलेले आहेत. दुसऱया टप्प्याचे काम पूर्ण झाल्यानंतर याठिकाणी अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी प्रवेश देण्यात येणार आहे.

सी. डी. बर्फीवाला पूल सुस्थितीत स्थिर-

सी. डी. बर्फीवाला या पुलासाठी देण्यातआलेला तात्पुरत्या स्वरूपाचा जॅकचा आधार काढण्यात आला आहे. त्यामुळे बर्फीवाला पूल पूर्णपणे खांबांच्या आधारावर स्थित आणि सुस्थितीत असल्याची माहिती पूल विभागाने दिली आहे. तसेच पी ११ याखांबाच्या ठिकाणी पूल उचललेल्या ठिकाणी पुलास भक्कम आधार देण्यात आला आहे, याचाच अर्थ कोणताही तात्पुरता आधार पुलाला देण्यात आलेला नाही, असे बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत स्पष्ट करण्यात येत आहे. 

मुख्यपुलाच्या दक्षिण भागातील काम जलदगतीने सुरु आहे. हे काम पूर्णकरताना सी. डी. बर्फीवाला पुलास दक्षिण मार्गिका जोडली जाईल, याची दक्षता घेतली जात आहे.  परिणामी, या भागातील वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यास मदत होणार आहे.

Related Post