मुंबई, तानसानदी : पावसाळ्यात धरण, तलाव, नदी, धबधब्याच्या ठिकाणी पर्यटकांना पिकनीकसाठी जिल्हा प्रशासनाकडून खबरदारीचा उपाय म्हणून 31 ऑगस्ट पर्यंत बंदी घातली आहे. तरीसुद्धा काही पर्यटक जीव धोक्यात घालून अशा निसर्गाच्या सानिध्यात तालुक्यात ठीकठिकाणी पार्टीसाठी आले असल्याचे दिसून येत आहे.
सध्या आषाढ महिना सुरू असून या महिन्यात गटारी साजरी करण्यासाठी अनेक जण नॉनव्हेज पार्ट्यांचे आयोजन करत आहेत. अशाच एका पार्टीसाठी कल्याणहून पाच मित्र कारने आले होते. , तानसा धरणाच्या गेटखाली कारमध्ये बसून ते पार्टी करत असतांना तानसा धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडल्यानं नदीपात्रात पाण्याचा विसर्ग वाढला. त्यात ते नदीच्या प्रवाहात वाहून गेले .

या पैकी गणपत चिमाजी शेलकंदे यांचा कारमध्ये गुदमरून मृत्यू झाला.. . हे सर्व जणतानसा धरणाच्या गेट नंबर एकच्याखाली शनिवारी दुपारी गाडीतबसून पार्टी करत होते. यावेळी अचानक तानसा धरणाचेस्वयंचलित २४ दरवाजे उघडण्यातआले. धरणातून अचानक मोठ्याप्रमाणात पाणी सोडण्यात आल्यानेहे पाचही जण गाडीसहनदीच्या प्रवाहात वाहून गेले. पाणीवाढले असल्याचे समजताच गाडीतील इतरतिघांनी उड्या मारून तेबाहेर पडले. मात्र, दोघांना गाडीच्या बाहेर पडता आलेनाही.
याघटनेची माहिती ग्रामस्थांनामिळताच त्यांनी तातडीनेबचाव व शोधकार्यसुरू केले. शोधकार्यातबेपत्ता झालेल्या एकाचामृतदेह सापडला असूनदुसऱ्याचा शोध सुरूआहे. मृत तरुण मूळचाकल्याण येथील रहिवासीआहे. दुसऱ्या बेपत्तातरुणाचा शोध सुरूआहे.