Mumbai

दक्षिण मुंबईत शिवसेने तर्फे घरो घरी तिरंगा वितरण

News Image

दक्षिण मुंबईत शिवसेने तर्फे  घरो घरी तिरंगा वितरण 

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने 'घरोघरी तिरंगा' अभियान राबवण्याचे आवाहन जनतेला केले आहे. या अभियानाच्या पार्श्वभूमीवर, शिवसेनेच्या वतीने दक्षिण मुंबईत विविध भागांत तिरंगा वितरणाचा उपक्रम हाती घेण्यात आला. ठाकूरद्वार, चिराबाजार, कुलाबा, मांडवी, कुंभारवाडा, कामाठीपुरा, गिरगाव, ताडदेव पोलीस वसाहत, एम पी मिल कंपाउंड अशा विविध भागांत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन तिरंग्याचे वितरण केले.

या उपक्रमाद्वारे, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संदेश आणि राष्ट्रध्वजाचा अभिमान सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवला. शिवसेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी, आणि स्थानिक नेत्यांनी या अभियानात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

कुलाबा विधानसभा समन्वयक प्रसाद गवाणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, विभाग प्रमुख दिलीप नाईक यांच्या नेतृत्वाखाली दक्षिण मुंबईतील विविध शिवसेना शाखांच्या माध्यमातून हा उपक्रम यशस्वीपणे राबवला जात आहे. या अभियानाच्या माध्यमातून देशप्रेमाची भावना जागृत करण्याचा शिवसेनेचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

 

Related Post