बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi Season 5 ) घरात सध्या वातावरण चांगलच टाईट झालं असल्याचं पाहायला मिळतंय. कारण आता वर्षा आणि निक्कीनंतर आता निक्की आणि आर्यामध्येही भांडणं झालं आहे. यामध्ये घरातल्या इतर सदस्यांनी देखील उडी घेतली. त्यामुळे वातावरण चांगलच बिघडलं असल्याचं पाहायला मिळतंय.
पहिल्याच टास्कमध्ये नियमभंग झाल्याने बिग बॉसने घरातल्यांना आता एक आठवडा जमिनीवर झोपण्याची शिक्षा दिली आहे. त्यावरुन निक्कीने वर्षा उसगांवकरांवर आरोप करत त्यांना यासाठी जबाबदार धरलं. त्यामुळे निक्की आणि वर्षा उसगांवकर यांच्यामध्ये वादाची ठिणगी पडली.
आर्या आणि निक्कीमध्ये नेमकं काय झालं?
आर्या आणि निक्की वाद होतात, तेव्हा आर्या निक्कीला म्हणते की, तुला घाबरायला पाहिजे. त्यावर निक्की आर्याला म्हणते की, तू फट्टू आहेस एक नंबरची. त्यामध्येच निक्की आणि अरबाजमध्येही हडतुड झाली. त्यामुळे या वादात घरातल्या इतर सदस्यांनी देखील उडी घेतली. आता या वादाचे काय पडसाद उमटणार याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली आहे.