शनिवार, दि. २७ जुलै: मुंबई जिल्हा नियोजन समिती आणि महिला व बाल विकास विभाग आणि बाल हक्क आयोगाच्या अध्यक्ष्या सुशीबेन शाह यांच्या माध्यमातून शिलाई यंत्र वाटप आणि प्रशिक्षण कार्यक्रम दक्षिण मुंबई येथील ताडदेव परिसरात आयोजित करण्यात आला होता. ह्या कार्यक्रमाला विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्हे आणि राज्यसभा खासदार मिलिंद देवरा यांची प्रमुख उपस्थिती होती. विधवा महिलांना आधार आणि स्वयंरोजगाराच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण ह्या हेतूने विनामूल्य शिलाई वाटपाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. आजच्या कार्यक्रम दरम्यान उपसभापती नीलम गोर्हे आणि राज्यसभा खासदार मिलिंद देवरा यांच्या हस्ते ६० महिलांना आज प्रातिनिधीक स्वपरुपात शिलाई मशीन वितरित करण्यात आल्या.
प्रत्येक विभागवार हि योजना राबिवण्यात येणार असून दक्षिण मुंबई सह इतर सहाही विभागात हा उपक्रम रबिण्यचा मानस आयोजक सुशीबेन शाह यांनी व्यक्त केला.
राज्य सभा खासदार मिलिंद देवरा यांनी महिला सबलीकरणासाठी सरकार आणि पक्ष कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली. त्याच प्रमाणे सरकार हे सर्व सामान्यांनचं सरकार असून आम्ही पूर्ण क्षमतेने महिलांसाठी योजना राबवू असे आश्वासन देखील दिले
आपल्या खुमासदार वक्तृत्वासाठी परिचित असलेल्या नीलम गोर्हे यांनी महिला सबलीकरण, महिलांचा सन्मान, महिलांचा स्वयंरोजगार अश्या अनेक मुद्द्यांवर भाष्य केला. सरकार राबवत असलेली लाडकी बहीण योजनाला विरोधकारणाऱ्या विरोधी पक्षाचा देखील नीलम गोर्हे ह्यांनी समाचार घेतला. नेमकं काय म्हणाल्या निलमताई पाहूया.
आजच्या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन महिला व बाल विकास अधिकारी शेलार मॅडम यांनी केले होते तर या कार्यक्रमाला शिवसेना उपनेते सुनील नरसाळे, विभाग प्रमुख दिलीप नाईक, माजी नगरसेवक दत्त नरवणकर, प्रमोद मांद्रेकर, हंसा मारू आणि शिवसेना महिला आघाडी, पदाधिकारी आणि स्थानिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.