Mumbai

शिवसेना भवनात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात संतप्त आंदोलन: बदलापूरातील अत्याचाराच्या निषेधार्थ राज्यभर मूक निदर्शने

News Image

शिवसेना भवनात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात संतप्त आंदोलन: बदलापूरातील अत्याचाराच्या निषेधार्थ राज्यभर मूक निदर्शने

मुंबईतील बदलापूर अत्याचार प्रकरणाच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने मुंबईतील शिवसेना भवन परिसरात जोरदार निषेध आंदोलन केले. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात आणि मुसळधार पावसात या आंदोलनात हजारो शिवसैनिक सहभागी झाले.

बदलापूर घटनेच्या विरोधात महाराष्ट्रभर मूक निदर्शने

बदलापूरमध्ये दोन शाळकरी मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने महाराष्ट्रभर संतापाची लाट उसळली आहे. महाविकास आघाडीने या घटनेच्या निषेधार्थ 'महाराष्ट्र बंद'ची हाक दिली होती. मात्र, उच्च न्यायालयाने बंद करण्यास मनाई केल्यानंतर राज्यभर मूक निदर्शने करण्याचा निर्णय घेण्यात आला. याच अंतर्गत शिवसेना भवनासमोर ठाकरे गटाने निषेध आंदोलन आयोजित केले.

                                

उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात तीव्र निदर्शने

मुंबईतील शिवसेना भवन परिसरात ठाकरे गटाने सरकारविरोधात तीव्र निदर्शने केली. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे यांच्यासह संजय राऊत, अनिल देसाई, आणि अन्य नेते या आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलकांनी डोक्याला काळ्या फिती बांधून आणि हातात काळे झेंडे घेऊन, सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. "मिंधे सरकारचं करायचं काय?", "खाली डोके वर पाय", "नराधमांना फाशी झालीच पाहिजे" अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

 

मुसळधार पावसातही आंदोलन कायम

मुंबईतल्या मुसळधार पावसातही ठाकरे गटाचे हे आंदोलन ठामपणे सुरू होते. हजारो शिवसैनिकांनी पावसाची पर्वा न करता आंदोलनात सहभाग घेतला. या आंदोलनामुळे शिवसेना भवन परिसरात वाहतूक कोंडी झाली होती.

 

उद्धव ठाकरेंची टीका: "संकटाचा सामना करण्याची हिंमत नाही"

उद्धव ठाकरे यांनी सरकारवर जोरदार टीका करताना म्हटले की, "जे उद्दाम आणि घटनाबाह्य सरकार सत्तेवर आहे, त्यांना नराधमांवर पांघरून घालण्याचे काम सुरू आहे." सरकारने घटनेच्या विरोधात ठाम भूमिका घेण्याऐवजी, आपल्या चेल्यांच्यामार्फत न्यायालयात बंदला अडथळा आणला, असा आरोप त्यांनी केला.

Related Post