कर्जत | रायगड जिल्हापरिषदेतील वैद्यकीय अधिकारीडॉ. सागर काटेआणि अन्य सातजणांनी चार व्यक्तींना गंडाघातल्याचा आरोप आहे. रेल्वेतील आणि मंत्रालयातील नोकऱ्या मिळवण्याचे आश्वासनदेऊन त्यांनी याव्यक्तींना फसवले. याप्रकरणात नेरळ पोलिसांनी गुन्हा दाखल केलाअसून दोन आरोपींना अटक केली आहे, तर इतर सहाजणफरार आहेत.
डॉ. सागरकाटे हे रायगडजिल्हा परिषदेत वैद्यकीय विभागात कार्यरत होतेआणि त्यांच्या शिक्षणामुळे त्यांना मोठा मानहोता. लोकांचा त्यांच्यावर विश्वास होता, ज्याचाकाटे यांनी गैरफायदा घेतला. त्यांनी त्यांच्या मित्रांसोबत मिळून लोकांनागंडवायला सुरुवात केली. मुंबईतील चिंतन हर्षददास शहा उर्फ चेतनमेहता, नवी मुंबईतील राहुल उर्फ आशिषरामभाऊ वाघ, विशालवसंत निवरे, राजदीपउर्फ राहुल दीपउर्फ प्रदीप निवेणकर, आणि सचिन हंबीरपाटील उर्फ शंभूदासयांच्यासोबत त्यांनी फसवणूककेली.
मध्य रेल्वेतील बुकिंग क्लार्क पदासाठीनेरळ गावातील प्रथमेशभिसे यास, कल्याणयेथील अर्चना पाचांगेआणि मालेंगाव नाशिकयेथील प्रतीक पाचांगेयांच्याकडून मोठ्या प्रमाणावर रक्कम उकळली. हेपैसे चिंतन शहा, राजदीप किंवा डॉ. काटे यांच्या माध्यमातून ऑनलाईन देण्यात आले. मंत्रालयातील चालक पदासाठीसचिन किसान गणाचार्य यांच्याकडून सहा लाखरुपये उकळले. बोगसनियुक्तीपत्रांमुळे ते डीआरएमकार्यालयात रुजू होण्यासाठी गेल्यावर त्यांचे नियुक्तीपत्र खोटे असल्याचे समजले. फसवणूक झाल्याचे लक्षातयेताच निलेश भिसेयांनी नेरळ पोलिसाततक्रार केली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखलकेला असून नितीनमहादू वाघ आणिराहुल उर्फ आशिषरामभाऊ वाघ यांनाअटक केली आहे, तर अन्य सहाजणफरार आहेत.