Mumbai

हे युग स्पर्धेचं युग आहे. इथे जो थांबला तो संपला - विभाग प्रमुख दिलीप नाईक यांचा तरुणांना सल्ला

News Image

हे युग स्पर्धेचं युग आहे.  इथे जो थांबला तो संपला - विभाग प्रमुख दिलीप नाईक यांचा तरुणांना सल्ला

दक्षिण मुंबई येथील चिराबाजार परिसरात शिवसेना शाखा क्रमांक २२२ आणि शाखा प्रमुख निलेश भोईटे तर्फे १०वी आणि १२वी च्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता.  मुसळदार पाऊस पडत असताना देखील विद्यार्थी आणि त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.  उपस्थितांना मार्गदर्शन करताना दक्षिण मुंबईचे विभाग प्रमुख दिलीप नाईक म्हणाले कि हे युग स्पर्धेचं युग आहे.  इथे जो थांबला तो संपला, आणि अश्या ह्या अटीतटीच्या स्पर्धेत आपण दिवस रात्र मान खाली घालून वर्ष भर मेहनत करता, अभ्यास करता त्या बद्दल आपले करावे तितके कौतुक थोडेच आहे.  कोणत्याही विषयाचे प्रेशर न घेता आवड म्हणून जोपासलं तर तुम्हाला यश प्राप्त झाल्या शिवाय राहणार नाही. 
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शिवसेना उपनेते अनिल पडवळ यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मोबाईल फोन चा योग्य वापर करण्याचा सल्ला दिला.  फोनचा वापर सकारात्मक गोष्टीं साठी झाला पाहिजे, ज्ञान संपादनात वापर झाला पाहिजे, कौशल्य विकासात वापर केला गेला पाहिजे पण हल्ली जो तो समाज माध्यमांवर वेळ वाया घालवताना दिसून येतायत अश्या गोष्टीं पासून आपण लांब राहिलो तर आपला उत्कर्ष पक्का आहे.   विभागातील विद्यार्थी ज्यांना १०वी आणि १२वी मध्ये ९० हून अधिक टक्के मिळाले आहेत अश्या सर्वांना स्मार्ट वॉच आणि बॅकपॅक भेट देण्यात आली.  इतर सर्व विद्यार्त्याना बॅकपॅक देऊन गौरविण्यात आले.  
कार्यक्रमाला विभाग संघटक विजय वाडकर आणि समन्वयक प्रसाद गवाणकर यांनी आवर्जून उपस्थिती दर्शवली.  कुलाबा विधानसभेचे सर्व शिवसेना पदाधिकारी आणि स्थानिक शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Related Post