घरात 'कॅप्टनसीची बुलेट ट्रेन' हे पहिलं कॅप्टनसी कार्य पार पडणार आहे'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनमधील (Bigg Boss Marathi Season 5) दुसरा आठवडा सुरू झाला आहे. पहिल्या आठवड्यात शांत असणारे घरातील सदस्य आता अॅक्टिव्ह मोडवर आले आहेत. कॅप्टन्सी टास्कच्या दरम्यान गुलिगत सूरज चव्हाण आणि वैभव चव्हाण यांच्यात वाद झाला. आडदांड वैभवला सूरज चव्हाण भिडला. यावेळी इरिनाने मध्यस्थी केली.
बिग बॉस मराठीच्या घरातील दुसऱ्या आठवड्याची सुरुवातच वादावादीने झाली. त्यानंतर आता घरात कॅप्टन्सी टास्क देण्यात आला आहे. हा कॅप्टन्सी टास्क बुलेट ट्रेनशी संबंधित आहे. समोर आलेल्या व्हिडिओनुसार, घरातील सदस्यांना या ट्रेनमधील जागा पटकावयाची आहे. टास्कमधील एका कोचमध्ये दोन्ही ग्रुपमधील सदस्य जागेवरून भांडताना दिसत आहेत. तर, ट्रेनच्या कोचमध्ये बसलेला वैभव आणि कोचबाहेर असलेला सूरज यांच्यात वादावादी होते.
सूरज आणि वैभव यांच्यात एकमेकांना हात लावण्यावरून वाद निर्माण झाल्याचे दिसते. बुक्कीत मुंडकं छाटेल असा दम देत हात लावून दाखव असे वैभव म्हणतो. त्यावर सूरज प्रतिआव्हान देत हात लावून दाखवल्यावर काय करणार असा उलट सवाल करतो. सूरजच्या प्रत्युत्तरने संतापलेला वैभव चढ्या आवाजात सूरजला म्हणतो की, दम असेल तर हात लाव...तुला मस्ती आलीय का...सूरजही त्याला तू मस्तीला आलाय का?असे म्हणतो. दम आहे का तुझ्यात असं वैभवने म्हटल्यावर सूरजही त्याला दम पाहायचा आहे का, असे म्हणतो. दोघे एकमेकांना भिडत असताना इरिना मध्ये येत सूरजला शांत राहण्यास सांगते. तर वैभव हा सूरजला आव्हानात्मक बोलताना दिसते. सूरजही त्याला आणखी डिवचत असतो. वैभवच्या बोलण्यामुळे सूरज त्याच्याकडे जात असताना दुसरीकडे इरिना आणि योगिता सूरजला आवरतात आणि मागे सारतात.
बिग बॉसच्या घरात कॅप्टन्सी टास्क
'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनमध्ये दहाव्या दिवशी पहिलं कॅप्टनसीचा टास्क आयोजित करण्यात आला आहे. घरामध्ये वाढत्या स्पर्धेमुळे, प्रत्येकजण आपला वैयक्तिक खेळ सुधारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. 'बिग बॉस मराठी'च्या नव्या एपिसोडमध्ये आता घरातील सदस्यांसाठी स्पर्धा रंगलेली दिसणार आहे. घराचा कॅप्टन बनण्यासाठी हा टास्क जिंकावा लागणार आहे.
'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनचा आजच्या भागाचा पहिला प्रोमो आऊट झाला आहे. या प्रोमोवरुन 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनला पहिला कॅप्टन मिळणार असल्याचं चित्र स्पष्ट होत आहे.