বিনোদন

बिग बॉस मराठी ५: सोशल मीडिया स्टार सूरज चव्हाण ठरला महाविजेता

News Image

बिग बॉस मराठी ५: सोशल मीडिया स्टार सूरज चव्हाण ठरला महाविजेता

मुंबई: महाराष्ट्राच्या प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलेल्या 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वाचा विजेता म्हणून सोशल मीडिया स्टार सूरज चव्हाणने बाजी मारली आहे. आज पार पडलेल्या ग्रँड फिनालेमध्ये सूरजने आपल्या 'झापुक झुपूक' शैलीत स्पर्धेची ट्रॉफी जिंकली. विजेतेपदासह त्याला १४.६० लाख रुपयांची रक्कम, एक इलेक्ट्रिक स्कूटर, तसेच पु.ना. गाडगीळ आणि सन्स लिमिटेडतर्फे १० लाखांचे खास गिफ्ट मिळाले आहे.

अभिजीत सावंत ठरला उपविजेता, निक्की तांबोळी तिसऱ्या स्थानावर

ग्रँड फिनालेमध्ये अंतिम फेरीत ६ स्पर्धक होते, ज्यात सूरज चव्हाण, अभिजीत सावंत, निक्की तांबोळी, धनंजय पोवार, अंकिता वालावलकर, आणि जान्हवी किल्लेकर यांचा समावेश होता. सूरजने सर्वाधिक वोट मिळवत विजेतेपद पटकावले, तर अभिजीत सावंतला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. निक्की तांबोळी तिसऱ्या स्थानावर आली. जान्हवी किल्लेकरने ९ लाख रुपयांची बॅग घेत सहाव्या स्थानावर राहण्याचा निर्णय घेतला.

७० दिवसांत घोषित झाला महाविजेता

या सिझनमध्ये १६ स्पर्धकांनी भाग घेतला होता, आणि ७० दिवसांच्या प्रवासानंतर महाविजेता घोषित करण्यात आला. प्रत्येक स्पर्धकाने आपल्या अनोख्या शैलीत प्रेक्षकांची मने जिंकली, परंतु सूरजने आपल्या सहज आणि दिलखेचक वागण्याने प्रेक्षकांचे मनं जिंकून विजेतेपदावर आपलं नाव कोरलं.

‘बिग बॉस’ ट्रॉफीची खासियत

सूरजला 'बिग बॉस मराठी ५' च्या लोगोचा डोळा आणि यंदाच्या पर्वाच्या थीमचे चक्रव्यूह असलेली खास ट्रॉफी मिळाली आहे. ही ट्रॉफी त्याच्या यशाची प्रतीक ठरली आहे.

Related Post