Mumbai

Milind Narvekar: विधान परिषदेसाठी ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकरांना उमेदवारी जाहीर?

News Image

विधान परिषदेसाठी महाविकास आघाडी आणि शिवसेना ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकर यांना संधी देण्यात येणार आहे. मंगळवारी (ता. 2 जुलै) ते अर्ज भरणार असून त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली जाऊ शकते. दरम्यान, महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या डॉ. प्रज्ञा राजीव सातव यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीकडून 2 उमेदवारांची नावे समोर आली आहे.

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 11 जागा या 27 जुलैला रिक्त होणार आहेत. या जागा विधानसभा सदस्यांमधून भरल्या जाणार असून सध्याचे संख्याबळ बघता भाजपच्या 5, शिवसेना शिंदे गटाच्या 2, राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या 2 तसेच महाविकास आघाडीचे 2 उमेदवार विजयी होण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकर यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरेंच्या अगदी विश्वासू व्यक्ती मानले जातात. त्यांनी गेली दोन दशके उद्धव ठाकरेंचे स्वीय सहाय्यक म्हणून काम पाहिले आहे. सध्या ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सचिव म्हणून काम पाहत आहेत.

भाजपने पाच उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. लोकसभेत अपयशी ठरलेल्या पंकज मुंडे यांना विधान परिषदेचे तिकीट देण्यात आले आहेत. त्यांचे नाव उमेदवार म्हणून घोषित केले असून सदाभाऊ खोत यांनादेखील उमेदवारी जाहीर झाली आहे. दरम्यान, राज्य विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहाच्या 11 जागांसाठी 12 जुलै रोजी द्विवार्षिक निवडणुका होणार आहेत.

Related Post