Mumbai

राजकोट किल्ला प्रकरणी विरोधक आक्रमक; "ठाणं कनेक्शन" चा आरोप

News Image

राजकोट किल्ला प्रकरणी विरोधक आक्रमक; "ठाणं कनेक्शन" चा आरोप

नौदल दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या  शौर्याला सलाम म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण मध्ये पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता. हा पुतळा दुर्दैवानं कोसळला आहे. यामागचं कारण अजून कळू शकलेलं नाही. आशयातच राजकीय पक्ष्यांच्या विविध प्रतिक्रिया समोर आल्या आहेत.  

"ठाणं कनेक्शन"

राष्ट्रवादी पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांनी ह्या घटनांचा थेट "ठाणं कनेक्शन" जोडलंय.  एक्स वरून प्रतिक्रिया देत त्यांनी म्हटले आहे कि, सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याचे काम ठाणे जिल्ह्यातील कंत्राटदाराकडे सोपविण्यात आले होते. त्याने आपले काम कसे केले असावे हे आता उघड झाले आहे. हि व्यक्ती आणि तिची संस्था यांना सर्व खात्यांच्या काळ्या यादीत टाकायला हवे, अशी आमची मागणी देखील त्यांनी केली आहे.

घाई गडबडीत उभारलेला पुतळा कोसळला

संभाजीराजे छत्रपती यांनी पंतप्रधानांनी उद्घाटन करण्यासाठी पुतळा घाई गडबडीत उभारलेला गेल्याचा आरोप केला आहे.  मुळातच आकारहीन व शिल्पशास्त्रास अनुसरून नसलेला व घाईगडबडीत उभारलेला हा पुतळा बदलावा म्हणून तेव्हाच त्यांनी पंतप्रधानांकडे पत्र लिहून मागणी केली होती. या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक वर्षभरात कोसळते यासारखी दुर्दैवी बाब कोणती नाही. अशा परिस्थितीत महाराजांच्या किल्ल्यांवर आपण कोणत्या अधिकाराने बोलणार असा खोचक सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.

सरकारला महाराजांचा एक भक्कम पुतळा उभारता आला नाही

छत्रपती शिवाजी महाराजांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी बांधलेले किल्ले अजूनही भक्कम आहेत आणि 'कंत्राटदार सरकार'ला महाराजांचा एक भक्कम पुतळा उभारता आला नाही, हा यांच्या कारभाराचा हिशेब आहे अश्या तीव्र शब्दात आमदार जितेंद्र आव्हाड ह्यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

पुतळा पुन्हा सन्मानाने उभारण्यात यावा, शिवभक्तांनी शांतता राखावी

सिंधुदुर्ग येथील भंग पावलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा सन्मानाने उभारण्यात यावा, यावेळी कोणाच्याही स्वार्थासाठी कामाच्या दर्जासोबत कसलीही तडजोड करू नये ही माझ्यासह तमाम शिवभक्तांची इच्छा आहे अशी मागणी खासदार अमोल कोल्हे यांनी केली आहे.  त्याच प्रमाणे घडलेली घटना दुर्दैवी असली तरी  शिवभक्तांनी शांतता राखावी, कायदा व सुव्यवस्था भंग होऊन छत्रपती शिवरायांच्या विचारांना धक्का लागणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन देखील कोल्हे यांनी केले आहे.

दोषींवर गुन्हे झाले पाहिजे अन्यथा आम्ही जिल्ह्यात नाही तर राज्यभर आंदोलन करू..

आमदार वैभव नाईक म्हणाले, शिवाची महाराजांचा पुतळ हा निकृष्ट कामामुळे कोसळल आहे. याबद्दल आम्हाला दु:ख होत असून एक शिवप्रेमी म्हणून आम्ही याचा निषेध करतो.सहा महिन्यांपूर्वी कोट्यवधी रुपये खर्च करून हा पुतळा उभरण्यात आला होता . ज्यावेळी काम सुरू होते  त्यावेळी स्थानिक लोकांनी सुद्धा कामासंदर्भात तक्रारी केल्या होत्या. पण त्यावेळी पद्धतशीरपणे दुर्लक्ष केले. जे विरोध करत आहे करत आहेत  ते आपल्या विरोधात आहे असा समज करुन घेतला.  400 वर्षापूर्वी  उभारण्यात आलेल्या किल्ल्याचा एकही चिरा ढासळला नाही, पण सहा महिन्यांपूर्वी येथील कम ढासळले होते. या प्रकरणी दोषींवर गुन्हे झाले पाहिजे अन्यथा आम्ही जिल्ह्यात नाही तर राज्यभर आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी ह्यावेळी माध्यमांशी बोलताना दिला.  

पुतळा त्वरित उभा करणं हे पहिला कर्तव्य राहील

शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी माध्यामांशी बोलताना म्हणाले कि हि घटना अत्यंत दुर्दैवी घटना आहे .  माझी खात्री आहे आमचे पालकमंत्री हेच पी डब्लू डी खात्याचे मंत्री आहेत.  ते सगळ्या प्रकाराने चौकशी करतील; पण चौकशी कारण्यापेक्षाही पुतळा त्वरित उभा करणं हे पहिला कर्तव्य राहील.  पंतप्रधान मोहोदयांच्या हस्ते त्याचे उदघाटन झाले होते आणि छत्रपतींनी बांधलेल्या पहिल्या समुद्री किल्ल्याच्या स्मरणार्थ हा पुतळा उभारण्यात आलेला आहे.  त्या मुले एक भावनिक महत्व आहे ते लक्षात घेऊन जे काही तातडीने करायला लागेल ते आमचं सरकार करेल असे आश्वासन त्यांनी राज्याच्या जनतेला दिले.

 

Related Post