Lifestyle

Shravan Recipe : तुमचाही श्रावणी सोमवारचा उपवास आहे? मग बनवा चविष्ट आणि आरोग्यदायी उपवासाची कचोरी

News Image

श्रावणातल्या शिवरात्रीच्या उपवासात विविध पदार्थांची चव घेणे आवडते. आज आम्ही तुम्हाला एक अशी रेसिपी सांगणार आहोत जिने चविष्ट आणि बनवायला सोपी आहे. चला तर, उपवासाच्या कचोरीची सोपी रेसिपी कशी तयार करावी हे पाहूया. 

उपवासाची कचोरी साहित्य 

२५० ग्रॅम शेंगदाणे
२५० ग्रॅम शिंगाड्याचे पीठ
हिरवी मिरची
आले
अर्धा टीस्पून काळी मिरी पावडर
अर्धा चमचा आमचूर पावडर
२ चमचे साखर
१ लिंबू
सैंधव मीठ
तळण्यासाठी रिफाइंड तेल

उपवासाची कचोरी बनवण्याची कृती

उपवासाची कचोरी बनवण्यासाठी प्रथम एका भांड्यात शिंगाड्याचे पीठ, सैंधव मीठ, दोन चमचे तेल एकत्र करून सर्व काही पाण्याने मळून घ्या.

यानंतर उकडलेले बटाटे सोलून चांगले मॅश करा. आता त्यात चिरलेली हिरवी मिरची, काळी मिरी पावडर, आमचूर पावडर, किसलेले आले, चवीनुसार सैंधव मीठ घालून सर्व चांगले मिक्स करा.

तुम्ही यात साखर आणि लिंबू टाकू शकता. तुम्हाला आवडत नसेल तर ते स्किप करता येईल. तुमच्या कचोरीच्या सारणासाठी मिश्रण तयार आहे.

आता तयार केलेल्या शिंगाड्याच्या पीठाचा छोटा गोळा घेऊन हलके लाटून घ्या. त्यात हे मिश्रण भरून नीट पॅक करून कचोरी तयार करा.

Related Post